शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी ? :13 Golden rule for Share Market
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी ?
मित्रांनो आज मी तुम्हाला शेअर मार्केटच्या नियमाबद्दल सांगणार आहे. जर तुम्ही शेयर मार्ट्रेकेट मध्ये ट्रेडिंग करुण पैसे कमाऊ इच्छित असाल तर हे खाली सांगितलेले सगळे नियम जरअगदी काटेकोरपणे व्यवस्थित पाळले तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये नुकसान होण्याचे चान्सेस खूप कमी असतील व तुम्ही शेयर मार्केट मधून जास्तीत जास्त नफ़ा कमवाल.
चला तर बघुया अत्यंत महत्वाचे शेयर मार्केट चे नियम – शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी ?
- सर्वात आधी तुम्ही हे निश्चित करा ही तुम्हाला शेअर मार्केटमध्ये रोज ट्रेडिंग करायची आहे ये कि काही वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे
- रोज ट्रेडिंग करायची असल्यास तुमच्याकड़े मार्केट ला लागणारा पुरेसा वेळ आहे का ते बघा.
- जेवढा वेळ तुम्ही शेयर मार्केट ला देऊ शकता त्या नुसार वरीलपैकी कोणत्याही पद्धतीने शेअर मार्केट मध्ये पैसे लावायचे असल्यास शेअर खरेदी विक्री साठी एक एक स्ट्रॅटेजी बनवा. व त्या स्ट्रेटेजी ची किमान २ – ३ महीने आधी पासून बॅक टेस्ट करा.
- रोज ट्रेडिंग करायची कि इन्व्हेस्टमेंट करायचे हे ठरवल्यानंतर तुम्ही स्वतःची रिस्क घेण्याची क्षमता लक्षात घ्या व तुमच्या क्षमते पलीकडे नुकसान होईल असे ट्रेड करू नका. जसे की लाँस रिकव्हर करण्या करिता कॅपॅसिटी पेक्षा मोठे ट्रेड चुकूनही घेऊ नये. असे पाहण्यात आले आहे की लॉस रिकव्हर करण्यासाठी बरेचसे लोग मोठे ट्रेड घेतात आणि आपले सारे भांडवल चुकीच्या ट्रेड मध्ये घालवून बसतात.
- तुम्ही तयार केलेल्या स्ट्रेटेजी नुसारच योग्य वेळीच खरेदी विक्री च्या ऑर्डर्स लावा.
- ट्रेड करताना नेहमी एका निश्चित संख्येत (Quantity) मधेच ट्रेड करा. जसेकी जर चुकून ४ – ५ दिवस सलग नुकसान जरी झाले तरी तुम्हाला तुमचा स्ट्रेटेजी नुसार निश्चित संख्येत (Quantity) मध्ये ट्रेड करता आला पाहिजे व तशी तुमची पैशांची मैनेजमेंट पाहिजे .
- सगळ्यात महत्वाचे दिवस भर ट्रेडिंग टर्मिनल च्या समोर बसू नका, कारन जर तुमच्या मध्ये प्रॉफिट मधे लवकर बाहेर पडायची व लॉस मधे पोजीशन होल्ड करायची वृत्ति असेल तर असे केल्याने तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेऊ शकता.
- रिस्क रिवॉर्ड रेशो १:२ च्या प्रमाणात ठेवा. म्हणजे तुम्ही जर प्रॉफिट 10 पॉईंटचा ठेवत असणार तर स्टॉप लॉस कमीत कमी 5 पॉईंटचा असावा
- स्टॉप लॉस न लावता चुकूनही ट्रेडिंग करू नये.
- व्याजाने पैसे काढून शेअर मार्केटमध्ये चुकूनही लावू नये
- डायरेक्ट ट्रेडिंग किवा इन्वेस्टमेंट करू नका त्या आधी टेक्निकल ऍनालिसिस मध्ये चार्ट पॅटर्न व चार्ट कसा वाचतात याची किमान बेसिक माहिती तरी जाणून घ्या.
- डे ट्रेडिंग म्हणजे इंट्राडे करताना ( संयम + नियमित पना + नियम ) ह्या सर्व गोष्टी धरून ट्रेडिंग करणे आवश्यक असते.
- किमान २ – ३ ट्रेडिंग अकाउंट असल्यास उत्तम एका अकाउंट मध्ये डे ट्रेडिंग जर करत असणार व दुसर्या मध्ये इन्वेस्टमेंट व तिसर्या मध्ये फ्यूचर ऑप्शन, कमोडिटीज़ आशा प्रकारे तुमचा पोर्टफोलियोच समायोजन करुण ठेवा.
तर मित्रानो वर सांगितलेल्या १३ शेअर मार्केटच्या नियमांचे जर तुम्ही तंतोतंत पालन केले तर निश्चितच तुम्ही शेअर मार्केट मधून कमाई करून शकाल परंतु तुम्हाला या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.
हे वाचा : शेअर मार्केट मध्ये तोटा का होतो? | Why We loss in share market?