४ नवीन IPO घेवून आलेत गुंतवणुकीची सुवर्ण संधी..!

48

मित्रांनो, इन्वेस्ट्मेंटसाठी पर्याय शोधत आहात का? IPO साठी वाट बघत आहात तर मग तयार राहा कारण पुढच्या आठवड्यात गुंतवणूकीसाठी चांगली संधी असणार आहे. कारण 9 ऑगस्ट व 10 ऑगस्ट रोजी 4 मोठे IPO खुले होणार आहेत. म्हणजेच पूर्ण आठवड्यात बाजारात कमाईची संधी असणार आहे.  Nuvoco Vistas , CarTrade Tech, Chemplast Sanmar आणि  Aptus Value Housing Finance India  या कंपन्यांचे IPO बााजारात येणार आहेत. जर IPO मध्ये पैसे गुंतवण्याची इच्छा असेल तर, या चारही IPO बाबतीत माहिती घ्या.

 

CarTrade Tech IPO

 

ऑनलाइन ऑटो क्लासिफाइड प्लॅटफॉर्म कारट्रेड टेकचा आयपीओ 9 ऑगस्टला सुरू होणार आहे. या आयपीओमध्ये 11 ऑगस्टपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. या इश्युच्या माध्यमातून 2999 कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे लक्ष आहे. कंपनीने या आयपीओची बॅंड प्राइज 1585 – 1618 रुपये ठेवली आहे. हा आयपीओ पूर्णतः  ऑफर फॉर सेलवर असणार आहे. CarTrade Tech ग्राहकांना नवीन आणि जुन्या दोन्ही प्रकारच्या कार खरेदी करण्याची सुविधा देते. 

आयपीओमध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के भाग राखीव असेल. तर 35 टक्के भाग गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी 15  टक्के भाग राखीव असणार आहे.

Nuvoco Vistas Corporation IPO

 

नुवोको विस्टाचा आयपीओ 9 ते 11 ऑगस्टच्या मध्ये खुला होणार आहे. या IPO साठी प्राइज बॅंड  ५६० ते ५७० रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. इश्यु साईज 5000 कोटींची असणार आहे.

What is Grey Market ? | Grey Market म्हणजे काय ?

Chemplast Sanmar IPO

 

स्पेशलिटी केमिकल बनवणारी कंपनी Chemplast Sanmar ltd  चा IPO 10 ते 12 ऑगस्टपर्यंत खुला असणार आहे. IPO ची बॅंड प्राइज ५३० ते ५४१ रुपये इतकी आहे. IPOच्या माध्यमातून 3850 कोटी रुपये उभारण्याची योजना कंपनीच आहे.

राखीव भाग

संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 75 टक्के

गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के

रिटेल गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के 

Aptus Value Housing Finance India IPO

Share Market Basic Information in Marathi 2021 : शेअर मार्केट म्हणजे काय?

या कंपनीचा IPO 10 ते 12 ऑगस्टदरम्यान खुला असणार आहे. या IPO साठी प्राइज बँड ३४६ ते ३५३ रुपये निश्चित करण्यात आली आहे.  या IPO तून 2780 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष कंपनीच असणार आहे.

मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा लेख आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पोस्ट आवडल्यास पोस्ट तुमच्या मित्र परिवारासह नक्की शेअर करा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.