मालमत्तेवर लागणारा कॅपिटल गेन टॅक्स – आयकर कायद्याचे कलम ,५४, ५४ EC,५४ F | Capital Gains Tax on Property – Section 54, 54EC, 54F of Income Tax Act
मित्रांनो आज आपण जाणून घेवू कॅपिटल गेन टॅक्स काय असतो , तो कधी लागतो आणि किती टक्के लागतो. तसेच काय आहेत सेक्शन ५४,५४EC आणि ५४F.
तर चला मग जाणून घेवूयात….
सर्व प्रथम आपल्याला समजून घेतलं पाहिजे की हा टॅक्स आपल्याला कशावर आकारला जातो. मित्रांनो कॅपिटल गेन टॅक्स हा आपल्याला कॅपिटल एसेट वर आकारला जातो.
Table of Contents
कॅपिटल एसेट (Capital Asset) म्हणजे काय ?
कॅपिटल एसेट म्हणजे तुम्ही केलेली गुंतवणूक जी तुम्हाला भविष्यात नफा कमवून देते, किंवा तिच्या विक्रीने तुमच्याकडे पैसे येतात. अश्या प्रत्येक गुंतवणुकीला आपण कॅपिटल असेट बोलतो.
कॅपिटल एसेट (Capital Asset) चे प्रकार
- जमीन
- इमारत
- घर
- शेअर
- बोण्ड्स
- म्यूचुअल फण्ड्स
- सोन / दागिने
- ट्रेडमार्क्स
- Leasehold Rights
- वाहन
- मशीन
हे सर्व कॅपिटल एसेट आहेत. ग्रामीण शेतजमीन ही कॅपिटल एसेट मध्ये मोडत नाही.
कॅपिटल गेन टॅक्स (Capital Gain Tax) म्हणजे काय ?
आपण जेव्हा एखादी कॅपिटल एसेट विकतो तेव्हा त्या विक्रीतुन मिळालेल्या नफ्याला लागणारा टॅक्स त्याला कॅपिटल गेन टॅक्स म्हणतात.
उदाहरणात : आज मी एक घर २० लाखाला विकत घेतलं ५ वर्षानी ते मी ३५ लाखाला विकल तर त्यात मला १५ लाख कॅपिटल गेन मिळाले. आता ह्या १५ लाखावर मला कॅपिटल गेन टॅक्स लागणार.
कॅपिटल गेन टॅक्सचे प्रकार | Types of Capital Gain Tax
कॅपिटल गेन टॅक्स २ प्रकारचे असतात:
- शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स (Short term capital gains tax/ STCG Tax)
- लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (Long term capital gains tax/ LTCG Tax)
दोघांमधील फरक
शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स |
लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स |
|
गुंतवणुकीची अवधी |
ही गुंतवणूक २४ महिन्यांपेक्षा कमी अवधी ची असते |
ही गुंतवणूक २४ महिन्यांपेक्षा जास्त अवधीची असते (पूर्वी ही अवधी ३६ महिन्यांची होती ) |
आकरण्यात येणारा टॅक्स |
तुमच्या टॅक्स स्लॅब नुसार |
फक्त २०% |
करात मिळणारी सवलत |
कोणतीही सवलत मिळत नाही |
सेक्शन ५४,५४ईसी आणि ५४ एफ नुसार |
निर्देशांक लाभ |
कोणताही लाभ मिळत नाही |
निर्देशांक लाभ मिळतो |
कॅपिटल गेन टॅक्समध्ये मिळणारी सूट
सेक्शन ५४ अंतर्गत Capital gains Tax मध्ये मिळणारी सूट
- कोणाला सेक्शन ५४ अंतर्गत सूट मिळू शकते : कोणीही व्यक्ति किंवा HUF(Hindu Undivided Family)
- पात्र मालमत्ता विक्री : निवासी घर मालमत्ता. ह्यात घरासाठी असलेल्या ओपेन प्लॉटचा समावेश होत नाही.
- किमान 24 महिन्यांचा होल्डिंग कालावधी आवश्यक आहे. जर मालमता २४ महिन्यांच्या आतच विकत असाल तर तुम्हाला करात सूट मिळत नाही.
- तुम्हाला झालेल्या नफ्यातून तुम्हाला नवीन १ किंवा जास्तीत जास्त २ निवासी मालमता तुम्हाला घ्याव्या लागतील. (उदा. जर तुम्हाला १५ लाख नफा झाला तर तुम्ही १५ लाख गुंतवून नवीन जागा/घर घेतले तर तुम्हाला १५ लाखावर १००% कर सवलत मिळेल )
- तुम्ही नवीन घरासाठी मोकळी जागाही घेवू शकता.
- Time Limit: तुम्ही ही मालमता १ वर्ष आधी किंवा २ वर्ष नंतर घेवू शकता. जेआर तुम्ही बांधकाम करणार असाल तर ३ वर्षाचा कालावधी मिळतो.
आणखी काही नियम
- जास्तीत जास्त २ कोटी कॅपिटल गेन क्लेम केले जावू शकते
- आयुषात फक्त एकदाच ह्याचा लाभ घेता येतो
- सूट परत घेतली जावू शकते जर नवीन मालमत्ता खरेदी किंवा निर्मितीच्या ३ वर्षाच्या आत विकली गेली.
- कॅपिटल गेन तुम्हाला कॅपिटल गेन स्कीम अंतर्गत असलेल्या बँक खात्यातच जमा करावी लागेल. असे खाते सरकारी आणि प्रायवेट दोन्ही बँक उपलब्ध करून देतात.
सेक्शन ५४EC अंतर्गत मिळणारी सूट
- कोणाला सेक्शन ५४EC अंतर्गत सूट मिळू शकते : कोणीही वयक्तिक व्यक्ति.
- पात्र मालमत्ता विक्री : शेअर, बोण्ड्स, म्यूचुअल फण्ड्स, घर,व्यापारी मालमत्ता आणि प्लॉटस
- किमान 24 महिन्यांचा होल्डिंग कालावधी आवश्यक आहे. तसेच त्या व्यक्तीच्या नावावर १ पेक्षा जास्त घर नसावे.
- तुम्हाला झालेल्या नफ्यातून तुम्हाला ठराविक बॉन्डस मध्ये कमीतकमी ५ वर्षाच्या लॉकइन पीरियड साठी निवेश करावे लागते.
- बॉन्डस: NHAI आणि REC.
- Time Limit: ६ महिन्याच्या आत तुम्हाला ही निवेश करावी लागते.
- ५० लाखाहून जास्त कॅपिटल गेन amount तुम्ही निवेश नाही करू शकत.
आणखी काही नियम
- ह्या निवेश वर तुम्हाला फक्त ५.५० – ६% इतके कमी रिटर्न्स मिळतात त्यातही त्यावर कर आकारला जातो.
- कॅपिटल गेन तुम्हाला कॅपिटल गेन स्कीम अंतर्गत असलेल्या बँक खात्यातच जमा करावे लागत नाही.
सेक्शन ५४ F अंतर्गत मिळणारी सूट
- कोणाला सेक्शन ५४F अंतर्गत सूट मिळू शकते : कोणीही व्यक्ति किंवा HUF(Hindu Undivided Family)
- पात्र मालमत्ता विक्री : निवासी घर मालमत्ता सोडून इतर सर्व ह्यात शेअर, बोण्ड्स, म्यूचुअल फण्ड्स,व्यापारी मालमत्ता आणि प्लॉटस येतात.
- किमान 24 महिन्यांचा होल्डिंग कालावधी आवश्यक आहे. जर मालमता २४ महिन्यांच्या आतच विकत असाल तर तुम्हाला करात सूट मिळत नाही.
- तुम्हाला झालेल्या नफ्यातून तुम्हाला फक्त नवीन निवासी मालमता घेता येते
- Time Limit: तुम्ही ही मालमता १ वर्ष आधी किंवा २ वर्ष नंतर घेवू शकता. जेआर तुम्ही बांधकाम करणार असाल तर ३ वर्षाचा कालावधी मिळतो.
आणखी काही नियम
- ह्यात तुम्हाला मिळालेली सर्व रक्कम निवेश करावी लागते म्हणजेच नफा आणि मुद्दल दोणीही.
- सूट परत घेतली जावू शकते जर नवीन मालमत्ता खरेदी किंवा निर्मितीच्या ३ वर्षाच्या आत विकली गेली.
- कॅपिटल गेन तुम्हाला कॅपिटल गेन स्कीम अंतर्गत असलेल्या बँक खात्यातच जमा करावी लागेल. असे खाते सरकारी आणि प्रायवेट दोन्ही बँक उपलब्ध करून देतात.