Types of loans हा बर्याच जणांच्या रुचितील विषय आहे. आपल्या देशात बर्याच जणांना पर्सनल लोण आणि होम लोन ह्या पलीकडे हे लोनचे काही पर्याय उपलब्ध आहे हे माहीतच नाही. आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण भारतात उपलब्ध असलेले लोन चे प्रकार पाहणार आहोत.
चला तर मग मुख्य विषयाची सुरवात करुयात ….
Table of Contents
Different types of loans
मुख्यतः दोन प्रकार प्रचलित आहेत लोनच्या बाबतीत.
- Secured Loans / Mortgage loans
- UnSecured Loans
Secured loans / Mortgage loans
Secured loans हे मूलतः ती कर्ज असतात ज्या कर्जाच्या बदल्यात आपणल कर्ज देणार्या संस्थाकडे काही वस्तु / संपत्ती कर्ज म्हणून ठेवतो. आपण कर्ज देण्यासाठी असमर्थ ठरला तर कर्ज देणारी संस्था आपण तारण / गहाण ठेवलेल्या वस्तु विकून आपली कर्जाची रक्कम वसूल करू शकते.
अश्या स्वरुपाच्या कर्जाचे व्याजदर ही कमी असते.
-
Home loan
Home Loan (गृहकर्ज) हे Secured लोनचा प्रकार आहे. ह्या प्रकारच्या कर्जामध्ये वित्तीय संस्थाकडे तुम्ही विकत घेतलेले घर गहाण म्हणून असते. ह्या कर्जाचा वापर करून तुम्ही तुमच्या आवडीचे घर खरेदी करू शकता.
Home Loan चे ४ प्रकार भारतामध्ये उपलब्ध आहे.
Types of Home Loan
- Land purchase loan: नवीन घरच्या जागेसाठी हे कर्ज मिळते.
- Home construction loan: घरच्या बांधकामासाठी हे कर्ज मिळते.
- Home loan balance transfer: तुमचे सध्याचे गृहकर्जाचेव्याज दर कमी करण्यासाठी हे कर्ज मिळते.
- Top up loan: ह्या कर्जाचा वापर करून तुम्ही घराचे नूतनीकरण करू शकता किंवा घरातील interiors साठी ही ह्या लोनचा वापर करू शकता.
-
Loan against property (LAP):
मालमत्तेवरील कर्ज हे अती सामान्य Secured लोनचा प्रकार आहे. ह्याचा वापर करून तुम्ही तुमच्या आवश्यक गरजांची पूर्तता करू शकता. ह्याचा वापर करण्यासाठी तुम्ही घर व्यावसायिक किंवा औद्योगिक मालमत्ता गहाण ठेवू शकता.
काही संस्था ह्या मालमत्तेच्या मूळ बाजार भावाच्या ५०% तर काही ८०% पर्यन्त कर्ज तुम्हाला देवू शकतात.
-
Loans against insurance policies
विमा पॉलिसी वर ही तुम्हाला कर्ज मिळू शकते. तुम्हाला हे माहीत होते का?
विमा पॉलिसीही तुम्हाला कर्ज मिळवून देवू शकतात,पण सर्वच विमा पॉलिसीवर कर्ज मिळत नाही. एंडॉमेंट आणि मनी-बॅक पॉलिसीज, ज्यांचे परिपक्वता मूल्य आहे, ते कर्ज मिळवण्यासाठी वापरले जाऊ शकतात.
-
Gold loans
सोने हे कर्ज मिळवण्याचे सर्वात जुने आणि उपयुक्त साधन मानले गेलेले आहे. ह्या कर्जसाठी तुम्ही सोन्याचे दागिने किंवा नाणी गहाण म्हणून ठेवू शकता.
हे कर्ज अल्प मुदतीसाठी तसेच छोट्या गरजेसाठी घेतले जातात.
-
Loans against mutual funds and shares
म्यूचुअल फंड आणि शेअरच्या बदल्यात ही लोन मिळते. तुम्ही कोणत्याही वित्तीय संस्थाकडे जावून तुम्ही तुमच्या ह्या ठेवीच्या मोबदल्यात कर्ज मिळवू शकता.
-
Loans against fixed deposits
Fixed Deposit हे तुमच्या ठेवीचाच एक प्रकार आहे आणि सर्वात सामान्य / विश्वसनीय ठेवीचा प्रकार आहे. ह्या ठेवीचा वापर करून ही तुम्हाला कर्ज मिळू शकते. हे कर्ज अत्यंत सहजपणे उपलब्ध होवू शकतो.
बर्याच वित्तीय संस्था ह्या तुमच्या ठेवीच्या ९०% पर्यन्त कर्ज देतात. परंतु हे कर्ज Fixed Deposit च्या कालावधी पेक्षा जास्त कालावधीसाठी नाही मिळत.
Unsecured loans
कोणतेही तारण न ठेवता वित्तीय संस्था कढून दिले जाणार्या कर्जाला Unsecure loans बोलेले जाते. अश्या प्रकारचे कर्ज वित्तीय संस्था तुमचे क्रेडिट स्कोर च्या आधारावर देतात. ह्यात तारण कोणतेही नसल्यामुळे अश्या प्रकारच्या कर्जांचे व्याजदर हे जास्त असतात.
-
Personal loan
Personal loan वेगवेगळ्या कारणासाठी घेवू शकता. हे सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त घेतले जाणारे कर्ज आहे. जर तुमचे क्रेडिट स्कोर चांगले असेल तर हे तुम्हाला सहजपणे मिळू शकते, परंतु ह्याचे व्याजदर हे जास्तच असते.
वैयक्तिक कर्ज खालील कारणांसाठी वापरले जाऊ शकते
- कौटुंबिक लग्नाचे सर्व
- सुट्टीसाठी किंवा आंतरराष्ट्रीय सहलीसाठी
- आपल्या घराच्या नूतनीकरणाच्या प्रकल्पाला
- आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी
- आपली सर्व कर्जे एकामध्ये एकत्रित करण्यासाठी
- अनपेक्षित/ अनियोजित/ तातडीचा खर्च पूर्ण करण्यासाठीआजच्या जलद गतीच्या जीवनात बँक व अन्य वित्तीय संस्था आपल्या ग्राहकांना Instant Loan Apps द्वारे त्वरित कर्ज उपलब्ध करून आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयन्त्न करतात.
-
Short-term business loans
Unsecure loan मधील दुसर्या प्रकारचे हे कर्ज आहे. ह्या कर्जाचा वापर व्यवसायातील विविध गरजा भागवण्यासाठी, व्यवसाय वाढीसाठी केला जातो.
Short-term business loans मधील काही प्रकार
- Working capital loans
- Machinery loans and equipment finance
- Small business loans for MSMEs
- Loans for women entrepreneurs
- Loans for traders
- Loans for manufacturers
- Loans for service enterprises
वापरावर आधारित कर्जाचे प्रकार
-
Education loans
Education loans (शैक्षणिक कर्ज) हे शिक्षणासाठी दिले जाणारे कर्ज आहे. उच्च शिक्षण किंवा परदेशातील शिक्षण पूर्ण करण्यासाठी हे कर्ज देण्यात येते.
शैक्षणिक कर्जाचे एक वैशिष्ट्य म्हणजे स्थगिती कालावधी, ज्यामध्ये विद्यार्थ्याला कोर्स पूर्ण केल्याच्या 12 महिन्यांपर्यंत किंवा त्याने/तिने काम सुरू केल्याच्या 6 महिन्यांपर्यंत ईएमआय न भरण्याचा पर्याय आहे,दोन्हीपैकी जे आधी असेल.
-
Vehicle loans
वाहन कर्ज दोन किंवा चारचाकी वाहन खरेदीसाठी दिले जाते. जे आपल्याला स्वप्नातील वाहन खरेदी करण्यास मदत करते. वाहनाचे कर्ज एकतर नवीन वाहन किंवा वापरलेले वाहन खरेदीवर दिले जाते.
तुमचा क्रेडिट स्कोअर, कर्जाचे उत्पन्नाचे प्रमाण, कर्जाची मुदत इ., कर्जाची रक्कम निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
Types of loans वर आधारित ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा.