8500 मध्ये ५०,००० नफा बेस्ट : Intraday trading strategy for beginners
Table of Contents
Intraday trading strategy for beginners
आजच्या या लेखाची सुरवात करण्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छितो की येथे आपण जितकं शक्य तितक शेअर मार्केट विषयी मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतो. परंतु शेअर मार्केट मध्ये आपण जितकं शिकू तितक कमी आहे. शेअर मार्केट बद्दल सखोल माहिती बद्दल माझ्या वाचण्यातील काही पुस्तक मी इथे तुम्हाला सुचवत आहे. तुम्ही ही पुस्तक वाचावी आणि आपला अभ्यास वाढवावा अशी आशा बाळगतो.
नक्की वाचा
हे वाचा : शेअर मार्केट मध्ये तोटा का होतो? | Why We loss in share market?
चला तर बघूया Intraday Trading ची एक जबरदस्त Strategy ….
मित्रांनो आज मी तुम्हाला इंट्राडे ची एक अशी जबरदस्त Strategy सांगणार आहे जिने फक्त रु ८५०० च्या गुंतवणुकीवर चक्क ५०,००० + प्रॉफिट दिलेला आहे. हि Strategy बघून तुम्हाला कल्पना येईल कि शेयर मार्केट मध्ये Intraday Trading in Marathi करण्याकरिता Strategy च किती महत्व असते ते. व तुम्ही सुद्धा तुमची स्वताची Strategy विकसित करू शकता किवां Strategy वेवस्थित समजून वापरू शकता.
मित्रांनो या स्ट्रॅटेजि चे नाव आहे 100% Free Unique Bajaj Finance Intraday Strategy For Working Professional म्हणजे हि Strategy अशा लोकांना गृहीत धरून बनवलेली आहे ज्या लोकांकडे ३.३० वाजेपर्यंत शेयर मार्केट समोर बसून रहायला वेळ नसतो. ते लोक सुधा ह्या Strategy चा उपयोग करून मार्केट मधे यशस्वीरित्या काम करू शकतील
या Strategy ची वैशिष्ट्ये.
- दिवसाला फक्त १ ट्रेड केला तरी पुरे व जास्तीत जास्त २ ट्रेड केले तरी चालेल.
- सकाळी १०.४५ नंतर ऑर्डेर लाऊन तुम्ही तुमचा इतर कामांना वेळ देऊ शकता.
- Stop Loss अनिवार्य आहे म्हणजे Loss मर्यादित* (फक्त Stop Loss jump नको व्हायला )
- प्रॉफिट ३.१० ते ३.१५ पर्यंत जेवढा मिडेल तेवढा* (बरेच दा लोक प्रॉफिट मध्ये लवकर बाहेर पडतात व Loss सांभाळून ठेवतात )
- फक्त रु. ५००० चा भांडवलावर देखील सुरुवात करू शकता.
- कोणती हि News बघायची गरज नाही.* (पण Black Monday, Black Friday, अशा अकस्मात आपदा बातम्या सोडून )
- पैशांची बचत, कारण कोणतेच Software, Signal, Strategy व कॉलस विकत घ्यायची गरज पडणार नाही.( ज्यावर लोक महिन्या काठी ७००० ते १०००० हजार खर्च करतात )
- बँक फिक्स डिपॉसिटी, म्यूचुअल फंड, सोन यांचा पेक्षा जास्ती Return.
- Intraday Trading Strategy असल्या मुळे निवांत पने झोप घेता येणार.
- ओव्हर ट्रेडिंग नाही केली व नियमांचे काटेकोर पणे पालन केले तर या Strategy मध्ये तुम्ही नौकरी सारखं दर महा चांगल Income उत्पन्न करु शकता.
Strategy चे नियम
- Strategy प्रमाणे कॅन्डल तयार झाल्यावरच ऑर्डेर लावायची
- दिवसाच्या पहिल्या २ कॅन्डल पूर्णपणे तयार झाल्यावरच ऑर्डेर लावायची.
- या Strategy नुसार दिवसाच्या पहिल्या २ कॅन्डल तयार झाल्यावर लगेच Buy / Sell चा दोन्ही ओर्डेर लाऊन ठेवा
- किवां जोपर्यंत जो पर्यंत एक ऑर्डर Execute होत नाही तो पर्यंत दुसरी ऑर्डर लावायची नाही भलेही मग तुमची पहेली ऑर्डर २.०० वाजता का Execute हो.
- वरील नियम क्रमांक ३ व ४ अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला दोघान पैकी एकाच नियमावर कायम रहाव लागेल. काही दिवस नियम क्रमांक ३ प्रमाणे व काही दिवस नियम क्रमांक ४ प्रमाणे जर Trading केली तरी देखील या Strategy चा काही उपयोग होणार नाही.
- कॅन्डल चार्ट १५ मिनिटांचा टाइम फ्रमे चा असावा
- रोज न विसरता Stop Loss लावणे अनिवार्य आहे
- दिवसाला २ पेक्षा जास्ती ट्रेड घेऊ नये.
- Loss कव्हर करण्या करिता कॅपॅसिटी पेक्षा मोठे ट्रेड चुकूनही घेऊ नका.
- Buy / Sell Position ३.१० ते ३.१५ लाच क्लोज करावी. मधेच Position क्लोज केल्यास Strategy चा काही उपयोग होणार नाही.
- रोज Trading करताना एक समान प्रमाण (Same Quantity) मध्ये ट्रेड करावा. कधी ५० तर कधी ३० तर कधी ६० तर कधी ४० अशा प्रकारे Trading केल्यास Strategy चा काही उपयोग होणार नाही.
- सलग काही दिवस लॉस झाल्यवर देखील तुम्ही समान प्रमाण (Same Quantity) मध्ये ट्रेड करू शकले पाहिजे इतका पैसा तुमचा कडे हवा. म्हणून सुरुवात अगदी कमी Quantity मध्ये करावी.
- Buy / Sell करिता २-३ point चा बफर लाऊ शकता मात्र नियमित लावाव.
- हि Strategy फक्त Bajaj Finance या शेयर वर ०१ जुन २०२० ते ०४ सप्टेंबर पर्यंत बॅक टेस्ट केलेली आहे. त्यामुडे इतर शेयर वर वापरतांना स्वता २-३ महिन्या आधीची बॅक टेस्ट करून बघावी.
- शेयर मार्केट मधे एकदम नवीन असल्यास आधी शेयर कसे खरेदी विक्री करतात, चार्ट कशे बनतात, कोण कोणत्या कॅण्डल Pattern असतात ह्याची माहिती करून घ्या. व सुरुवातीला किमान १ ते २ महिने पेपर मोड वर Trading करा.
- Stop Loss जास्तीत जास्त ६० पोइंट चा ठेवावा. कारण बरेच दा पहिल्या कॅण्डल चा Difference च १०० – १५० पोइंट पेक्षा जास्ती असतो.
हे वाचा : Share Market Basic Information in Marathi 2021 : शेअर मार्केट म्हणजे काय?
तर चला बघूया काय आहे Stock market strategy for beginners वर ०१ जुन २०२० ते ०४ सप्टेंबर पर्यंत बॅक टेस्ट चा Performance.
परिस्थिती 1
Stock market strategy for beginners जर वर दिलेल्या इमेज चे निरीक्षण केले तर तुम्हाला दिसेल की दिवसाच्या दुसऱ्या १५ मिनिटांचा कॅण्डल ने पहिल्या कॅण्डलचा High तोडला आहे व जेव्हा अशी परिस्थिति बनते. तेव्हा दुसरी कॅण्डल पूर्ण झाल्यावर लगेच तिच्या टॉप वर Buy ऑर्डर लावायची असते किंवा जसे मी वर सांगितले आहे, तुम्ही Buy ऑर्डर लावण्या करिता दोन ते तीन पॉइंट चा बफर देखील देऊ शकता.तसेच दुसऱ्या कॅन्डल च्या टॉप वर बाय ऑर्डर लावल्यानंतर पहिल्या कॅण्डल च्या Low ला किंवा Low पासून दोन ते तीन पॉईंट बफर सोडून Sell / Stop Loss ऑर्डर लावावी.
वर सांगितल्या प्रमाणे Situation झाल्यावर तुम्ही दोन्ही प्रकारे Trade घेऊ शकता त्यापैकी तुम्हाला कोणता प्रकार योग्य वाटतो ते तुम्ही ठरवायचे आहे व एकाच पद्धतीने नेहमी Trade करावा. व टार्गेट दुपारी ३.१० ते ३.१५ पर्यंत जो भाव मिळेल ते.
परंतु त्याचा आधीच जर Stop Loss हिट झाला तर तुमचा रिस्क नुसार व भांडवला नुसार जिथे Stop Loss हिट झाला तिथून च Sell ची ऑर्डेर लाऊ शकता. मात्र आता Stop Loss पहिल्या कॅन्डल चा Top असेल. परंतु जर पुन्हा तिसर्यांदा Stop Loss हिट झाला तर मात्र ३ रा ट्रेड घेणे टाळा.
परिस्थिती 2
वर दिलेल्या इमेज चे निरीक्षण केल्यास तुम्हाला दिसेल कि ह्या आधीच्या Situation चा हि अगदी उलट Situation आहे. त्यामुडे येथे दुसर्या कॅण्डलचा Low वर किवां २-३ पोइंट खाली Sell ऑर्डर लावायची व पहिल्या कॅण्डल चा Top वर किवां Top चा २-३ पोइंट वर Buy / Stop Loss ऑर्डर लावायची. व टार्गेट दुपारी ३.१० ते ३.१५ पर्यंत जो भाव मिळेल ते.
परंतु त्याच्या आधीच जर Stop Loss हिट झाला तर तुमच्या रिस्क नुसार व भांडवला नुसार जिथे Stop Loss हिट झाला तिथून च Buy ची ऑर्डेर लाऊ शकता. मात्र आता Stop Loss पहिल्या कॅन्डल चा Low असेल. परंतु जर पुन्हा तिसर्यांदा Stop Loss हिट झाला तर मात्र ३ रा ट्रेड घेणे टाळा.
परिस्थिती 3
आता पुन्हा वर दिलेल्या इमेज चे निरीक्षण केल्यास दिसेल कि दुसर्या कॅन्डल ने पहिल्या कॅन्डल चा ना High तोडला ना Low तोडला म्हणून अशा Situation मध्ये पहिली कॅण्डल पूर्ण होताच तिचा Top वर Buy व Low वर Sell ऑर्डर लाऊन ठेवल्यास दोघान पैकी जी पण ऑर्डर पहिले Execute झाल्यवर दुसरी ऑर्डर आपोआप Stop Loss च काम करेल. व बाकी सगळ्या सारखच आहे. टार्गेट दुपारी ३.१० ते ३.१५ पर्यंत जो भाव मिळेल ते.
परंतु त्याच्या आधीच जर Stop Loss हिट झाला तर तुमच्या रिस्क नुसार व भांडवला नुसार जिथे Stop Loss हिट झाला तिथून च Buy ची ऑर्डेर लाऊ शकता. मात्र आता Stop Loss पहिल्या कॅन्डल चा Low असेल. परंतु जर पुन्हा तिसर्यांदा Stop Loss हिट झाला तर मात्र ३ रा ट्रेड घेणे टाळा.
परिस्थिती ४
हि आहे ४ थी व शेवट ची Situation ह्या व्यतिरिक्त Situation होण्यची शक्यता एकदम कमी आहे या मधे जर तुम्ही पुन्हा वर दिलेल्या इमेज चे निरीक्षण केली तर दिसेल कि दुसर्या कॅन्डल ने पहिल्या कॅन्डल चा High पण तोडला व Low पण तोडला म्हणून अशा Situation मध्ये दुसरी कॅण्डल पूर्ण होताच तिचा Top वर Buy व Low वर Sell ऑर्डर लाऊन ठेवल्यास दोघान पैकी जी पण ऑर्डर पहिले Execute झाल्यवर दुसरी ऑर्डर आपोआप Stop Loss च काम करेल. व बाकी सगळ सारखच आहे. टार्गेट दुपारी ३.१० ते ३.१५ पर्यंत जो भाव मिळेल ते.
परंतु त्याच्या आधीच जर Stop Loss हिट झाला तर तुमच्या रिस्क नुसार व भांडवला नुसार जिथे Stop Loss हिट झाला तिथून च Buy ची ऑर्डेर लाऊ शकता. मात्र आता Stop Loss पहिल्या कॅन्डल चा Low असेल. परंतु जर पुन्हा तिसर्यांदा Stop Loss हिट झाला तर मात्र ३ रा ट्रेड घेणे टाळा.
नक्की वाचा