PUNJAB NATIONAL BANK MADHUN LOAN KASE GHYAYCHE: पंजाब नॅशनल बँकेकडुन लोन कसे घ्याचे ?-How to Apply for Personal Loan in Punjab National Bank

79

मित्रांनो, आपण कितीही चांगल्या पगारची नोकरी करत असू किंवा चांगला व्यवसाय करत असू तरीही आजच्या महागाईच्या काळात पैसे हे नेहमी अपुरेच पडत असतात. कधी घरचे खर्च असो किंवा मेडिकल अत्यावश्यकता कोणत्याही कारणासाठी पैसे हे लागतातच. अश्या वेळी अचानक पैसे उभे करणे खूप अवघड असते.

ह्या प्रसंगी नातेवाईक किंवा जवळील मित्रांवर अवलंबून राहणे बर्‍याचदा लाजिरवाणे वाटते. मग त्या पलीकडे जावून बँक ही अशी एकमात्र पर्याय आपल्याकडे असतो जी खात्रीशीर आणि कमी व्याजवर आपल्याला लोन उपलब्ध करून देवू शकते. पूर्वी सारखं आता बँकिंग आता इतका जटिल विषय नाही राहिला. तसेच different types of loan सहज रित्या बँक आणि इतर वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांना Instant loan apps च्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे.

हा काळ ऑनलाइनचा, म्हणून आजच्या ह्या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत की ऑनलाइन कश्या प्रकारे आपण आपल्या भरोशातील बँकेपैकील एक पंजाब नॅशनल बँक कढून पर्सनल लोन (अर्थसाहय) मिळवू शकतो. मित्रांनो ही पोस्ट काळजी पूर्वक वाचा कारण ह्या पोस्ट मध्ये आपण सविस्तर माहीत उपलब्ध करून देत आहोत की PUNJAB NATIONAL BANK  कडे आपण पर्सनल लोन आवेदन कसे करू शकतो .

PUNJAB NATIONAL BANK पर्सनल लोनसाठी कोणते कागदपत्र मागते, किती दिवसात PUNJAB NATIONAL BANK तुम्हाला लोन देते आणि त्यावर व्याज किती आकारते.

तर चला मित्रांनो जाणून घेवूया सर्व माहिती.

PUNJAB NATIONAL BANK किती लोन देते ?

मित्रांनो PUNJAB NATIONAL BANK  आपल्याला किमान ५०,००० तर जास्तीत जास्त १५,००,००० चे लोन देते.

काय आहे PUNJAB NATIONAL BANK  च्या लोन repayment चा कालावधी ?

PUNJAB NATIONAL BANK कढून घेतलेले लोन हे १२ महीने ते ६० महिन्यांच्या आत आपणास परत करावे लागते.

PUNJAB NATIONAL BANK किती व्याज आकारते?

मित्रांनो PUNJAB NATIONAL BANK  आपल्या ग्राहकांना  ८.९५ % – १४.५०%  पर्यंत व्याज आकारते.

काय आहेत कागदपत्र ?(List of Document)

१. २ पासपोर्ट साइज फोटो

२. रहिवाश्याचा पत्ता  (Address Proof)

३. आयडी प्रूफ (ID Proof)

४. उत्पनाचे प्रमाणपत्र (Income Related Documents)

कोण करू शकतो apply ?

१. ज्यांचे वय कमीत कमी २१ वर्ष ते  जास्तीत जास्त ५८ वर्ष असावी.

२. मासिक उत्पन्न किमान ३०,००० महिना असावा

३. सीबील स्कोर किमान ६५० असावा

Why Punjab National Bank?

१. कुठूनही आणि कधीही लोन साठी आवेदन करता येते.

२. Punjab National Bank खूप लवकर approval देते.

३.१००% ऑनलाइन प्रोसेस

कसे करावे आवेदन Punjab National Bank कडे?

  • Punjab National Bank च्या वेबसाइट वर लॉगिन करा.
  • तुमच्या उजव्या बाजूस एक मेनू दिसेल, त्यातील ऑनलाइन सर्विसेस (online services) मधील लोन हा ऑप्शन निवडा
  • आता नवीन window उघडेल त्यातील Personal Loan New Application ह्या ऑप्शन वर क्लिक करा
  • नवीन window open होईल इथे तुमचं नाव आणि मोबाइल नंबर टाका
  • दिलेल्या नंबर वर OTP येईल तो enter करा.
  • आता इथे तुम्हाला तुमची वयक्तिक आणि कार्यालयीन माहिती टाकायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्र वेबसाइट वर अपलोड करायचे आहे.
  • बस…! आता बँक तुमची eligibility check करेल, तुम्ही eligible असला तर तुमची लोन अमाऊंट तुमच्या खात्यात बँक ट्रान्सफर करेल.

मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण जाणून घेतले  की आपण पंजाब नॅशनल बँकेच्या कर्जासाठी कसे अर्ज करू शकता. आपल्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल, पंजाब नॅशनल बँकेकडून तुम्हाला किती काळ कर्ज मिळेल, किती व्याज आकारले जाईल आणि बरेच काही, आज आपल्या पोस्टमधून तुम्हाला कळाले .

मित्रांनो जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा आणि तुम्हाला या पोस्टशी संबंधित काही शंका असल्यास आपण खाली टिप्पणी देऊन विचारू शकता. मित्रांनो, आपण हे पोस्ट काळजीपूर्वक वाचले आहे आणि त्यास आपला मौल्यवान वेळ दिला आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद पुढील पोस्टमध्ये भेटू.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.