SBI Personal loan : Apply, Eligibility, Interest Rate 2021

60

SBI Personal loan

मित्रांनो, पर्सनल लोनच्या सिरीज मधील हा नवीन आर्टिकल घेवून आज आम्ही तुमच्या समोर आलो आहोत. ह्या आर्टिकल मध्ये आपण बघणार आहोत SBI Personal Loan बाबत. ह्या आधी आपण   different types of loan बद्दल वाचाल आहे. तसेच बर्‍याच वित्तीय संस्था कश्या  Instant loan apps च्या माध्यमातून ग्राहकांना लोन उपलब्ध करून देत आहे हे बघितलं आहे. 

हा काळ ऑनलाइनचा, म्हणून आजच्या ह्या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत की ऑनलाइन कश्या प्रकारे आपण आपल्या भरोशातील बँकेपैकील एक SBI BANK कढून Personal Loan (अर्थसाहय) मिळवू शकतो. मित्रांनो ही पोस्ट काळजी पूर्वक वाचा कारण ह्या पोस्ट मध्ये आपण सविस्तर माहीत उपलब्ध करून देत आहोत की SBI Bank  कडे आपण पर्सनल लोन आवेदन कसे करू शकतो .

SBI Bank पर्सनल लोनसाठी कोणते कागदपत्र मागते, किती दिवसात SBI Bank तुम्हाला लोन देते आणि त्यावर व्याज किती आकारते.

तर चला मित्रांनो जाणून घेवूया सर्व माहिती.

SBI Personal loan

SBI तुम्हाला झटपट पर्सनल लोन देते. पर्सनल लोनमध्ये SBI चे दोन Product आहेत.

१. SBI Personal Loan

२. SBI Kavach

SBI Bank किती लोन देते ?

मित्रांनो SBI Bank  आपल्याला किमान २४,००० तर जास्तीत जास्त २०,००,००० चे लोन देते. तुम्हाला किती लोन मिळेल हे पूर्णतः तुमच्या Cibil स्कोर तसेच पूर्व लोन ट्रक वर अवलंबून असते.

शैक्षणिक कर्ज | What is Education loan ?

काय आहे SBI Bank  च्या लोन repayment चा कालावधी ?

SBI Bank कढून घेतलेले लोन हे १२ महीने ते ७२ महिन्यांच्या आत आपणास परत करावे लागते.

SBI Bank किती व्याज आकारते?

मित्रांनो SBI Bank  आपल्या ग्राहकांना  9.60% p.a. – 15.60% p.a  पर्यंत व्याज आकारते.

काय आहेत कागदपत्र ?(List of Document)

१. २ पासपोर्ट साइज फोटो

२. रहिवाश्याचा पत्ता  (Address Proof)

३. आयडी प्रूफ (ID Proof)

४. उत्पनाचे प्रमाणपत्र (Income Related Documents)

 

कोण करू शकतो apply ?

१. ज्यांचे वय कमीत कमी २१ वर्ष ते  जास्तीत जास्त ५८ वर्ष असावी.

२. मासिक उत्पन्न किमान १५,००० महिना असावा

३. सीबील स्कोर किमान ६५० असावा

४. कमीत कमी १ वर्ष नोकरदार असावा.

Why SBI Bank loan?

१. कुठूनही आणि कधीही लोनसाठी आवेदन करता येते.

२. SBI Bank झटपट approval देते.

३.१००% ऑनलाइन प्रोसेस

कसे करावे आवेदन SBI Personal Loan साठी?

  • SBI Bank च्या वेबसाइट वर लॉगिन करा.
  • आता नवीन window उघडेल इथे तुमची Basic माहिती भरून Eligibility तपासा.
  • नवीन window open होईल इथे तुमची Eligibility Amount दिसेल. तुम्हाला हवी असलेली रक्कम आणि Tenure Select करा आणि Apply Now वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला SBI Personal loan Application form भरायला सांगतील. हा फॉर्म नीट भरा आणि तुमच्या मोबाइल वर आलेल्या OTP सोबत Submit करा.
  • त्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्र वेबसाइट वर अपलोड करायचे आहे.
  • बस…! आता तुमचे Document चेक केले जातील. तुम्ही eligible असला तर तुमची लोन अमाऊंट तुमच्या खात्यात बँक ट्रान्सफर करेल.

मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण जाणून घेतले  की आपण SBI BANK च्या कर्जासाठी कसे अर्ज करू शकता. आपल्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल SBI BANK कडून तुम्हाला किती काळ कर्ज मिळेल, किती व्याज आकारले जाईल आणि बरेच काही, आज आपल्या पोस्टमधून तुम्हाला कळाले .

मित्रांनो जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा आणि तुम्हाला या पोस्टशी संबंधित काही शंका असल्यास आपण खाली टिप्पणी देऊन विचारू शकता. मित्रांनो, आपण हे पोस्ट काळजीपूर्वक वाचले आहे आणि त्यास आपला मौल्यवान वेळ दिला आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद पुढील पोस्टमध्ये भेटू.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.