बिट्कोईनच्या ट्रेडिंग वर द्यावा लागणार कर….जाणून घ्या काय आहेत नवीन नियम? | Tax on cryptocurrency

108

मित्रांनो, जर तुम्ही बिट्कोईन किंवा अन्य कोणत्याही क्रिप्टोकरंसी (cryptocurrency) मध्ये ट्रेड करत असाल तर भारत सरकार तुम्हाला त्यावर कर लावणार आहे. नवीन नियमांनुसार ३ वर्षांनंतर जो कोणी गुंतवणुकदार आपली क्रिप्टोकरंसी (cryptocurrency) विकेल तर त्याला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन (Long Term Capital Gains) नुसार २०% कर भरावा लागणार आहे.

आपल्याला माहीतच आहे भारतात गेल्या एक दशकात बिट्कोईन व त्या सारख्या अन्य क्रिप्टोकरंसी (cryptocurrency) मध्ये लोकांनी गुंतवणूक करणे प्रचंड वाढवलेले आहे. काही रुपयात येणारा बिट्कोईन आज लाखोंच्या घरात पोहचला आहे. बिट्कोईनच्या खरेदी आणि विक्रीतुन बरेच लोक माला माल झाले आहेत आणि त्यावर कोणत्याही प्रकारचा कर हा द्यावा लागत नव्हता. परंतु सरकारला आता हे मान्य नाही, नवीन नियमांनुसार आता प्रत्येक व्यक्तिला बिट्कोईन,एथेरियम व त्या सारख्या अन्य कोणत्याही डिजिटल मनीच्या मार्फत कमवेलेल्या नफ्याची माहिती तुम्हाला सरकारला द्यावी लागेल आणि त्यावर कर ही भरावा लागेल.

आता लोकांना प्रश्न आहे की क्रिप्टोकरंसी (cryptocurrency) द्वारे मिळालेला नफा हा इन्कम टॅक्स च्या कोणत्या खनात दाखवावा. त्यावर किती टॅक्स द्यावा लागेल आणि ते कोणत्या प्रकारे भरावे. लोकांमध्ये हा संभ्रम दिवेसेंदिवस वाढत आहे आणि ते साहजिकच आहे कारण अजून इन्कम टॅक्स विभागाकधून  काढून ह्या बाबत कोणतेच स्पष्ट निर्देश लोकांना अजून देण्यात आलेले नाही. बिट्कोईन सारख्या क्रिप्टोकरंसी (cryptocurrency) मध्ये निवेश करणार्‍या लोकांमध्ये हे जाणून घ्याची चिंता वाढत आहे की त्यांना टॅक्स किती लागणार,कसा लागणार व तो भरायचा तरी कसा ?

 

काय आहे इन्कम टॅक्सचा रुल?

इन्कम टॅक्सचा नियम सांगतो की फक्त शेती वरुण होणारी कमाई ही टॅक्स फ्री आहे. बाकी कोणत्याही मार्गाने होणार्‍या कमाई वर तुम्हाला टॅक्स हा द्यावाच लागेल. अश्यात कोणी व्यक्ति बिट्कोईन किंवा अन्य कोणत्याही क्रिप्टोकरंसी (cryptocurrency) ने कमाई करतो टीआर त्याला कर हा द्यावाच लागणार. जर एकदा गुंतवणूकदार  crypto मध्ये कमाई करतो, तर अश्या गुंतवणूकला व्यावसायिक कमाई मानली जाईल आणि त्याच हिशोबाणे तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. अश्यातच तुम्हाला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन नुसार टॅक्स भरावा लागेल. त्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट आणि बॅलेन्सशिट सुधा तयार करावी लागणार आहे.

 

किती द्यावा लागेल टॅक्स?

मित्रांनो कॅपिटल गेन टॅक्स नुसार तुमची गुंतवणूक ही ३ वर्षाची किंवा त्याहून जास्त ची असेल तर तुम्हाला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स स्लॅब नुसार २०% टॅक्स भरावा लागेल. तसेच जर तुमची गुंतवणूक ३ वर्षापेक्षा कमी असेल तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स नुसार तुम्हाला तुमच्या आय प्रमाणे टॅक्स भरावा लागेल. त्यासाठी तुम्ही कोणत्या टॅक्स ब्रकेट मध्ये येता हे तुम्हाला पाहावं लागेल.

 

पैश्यांच्या कमाई सारखाच बिट्कोईन पण एक धंधा

सरकारच्या एका नोटिफिकेशन मध्ये सरल उल्लेख केला गेला आहे की बिट्कोईन ट्रेडिंग ही बिसनेस इन्कम म्हणूनच पहिली जाईल. ह्यावर टॅक्स स्लॅबच्या वेग वेगळ्या कॅटेगरी नुसार टॅक्स गुंतवणूकदारांना द्यावा लागेल. असे न केल्यास गुंतवणूकदारांना सरकारी करवाईला सामोरे जावे लागेल. तसे बघायला गेले तर अजुन सरकारकडून कोणतेच स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाही. मात्र सरकारच वागणं असच आहे आम्ही काही सांगो किंवा नाही तुम्ही गपचूप टॅक्स आम्हाला द्याचा म्हणजे द्यायचा….

कमाई कोणतीही असो मित्रांनो टॅक्स तर द्यावाच लागेल. कशी होती ही माहिती कमेन्ट बॉक्स मध्ये आम्हाला नकीच कळवा. आमच्या facebook आणि Instagram च्या पेजला लाइक आणि फॉलो करा. आणि शेअर करून आम्हावरील आपल प्रेम दर्शवा. धन्यवाद !

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.