लेट्टर ऑफ क्रेडिट चे प्रकार | Types of Letter of Credit

70

मित्रांनो, आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत की लेट्टर ऑफ क्रेडिटचे किती प्रकार आहेत. कोणत्या वेळेस कोणत्या प्रकारचे लेट्टर ऑफ क्रेडिट वापरण्यात येते?मुख्याता हे ८ प्रकारचे असतात. चला जाणून घेवूया त्या कोणत्या प्रकारचे असतात.

कमर्शियल लेट्टर ऑफ क्रेडिट (Commercial LC)

 • सर्वसामान्यपणे इंटरनॅशनल ट्रेड साठी वापरण्यात येते.
 • इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स (ICC) ने  काही नियम ठरवून दिलेले असतात त्याप्रमाणे तयार करण्यात येते.
 • इम्पोर्ट – एक्सपोर्ट लेट्टर ऑफ क्रेडिट च्या नावानेही संबोधले जाते.

स्टँड बाय लेट्टर ऑफ क्रेडिट (Stand By LC)

 • हे पहिल्या लेट्टर ऑफ क्रेडिट पेक्षा खूप वेगळे असते
 • हे तेव्हा प्रस्तुत होते जेव्हा एखाद्या नियमाचा उल्लंघन केले जाते
 • इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स (ICC) ने ह्यासाठी वेगळे नियम ठरवलेले आहेत

रद्द करण्यायोग्य लेट्टर ऑफ क्रेडिट (Revocable LC)

 • ह्यात Opening Bank लेट्टर ऑफ क्रेडिट कधीही बदलू शकते किंवा रद्द करू शकते तेही विक्रेत्याला त्याबद्दल सूचित केल्या शिवाय.
 • इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स कडे ह्याचा उल्लेख नाही
 • खरेदार किंवा विक्रेताचे हक्क ह्यात सुरक्षित नसल्यामुळे ह्याचा जास्त वापर केला जात नाही.

त्यामुळे अपरिवर्तनीय लेट्टर ऑफ क्रेडिटचाच वापर करण्यात येतो. रद्द करण्यायोग्य लेट्टर ऑफ क्रेडिट वगळता सर्व लेट्टर ऑफ क्रेडिट हे अपरिवर्तनीय लेट्टर ऑफ क्रेडिटच असतात जोपर्यंत दोन्ही पार्टी ह्या लेखीस्वरुपात कोणत्या बदलसाठी एकमत होत नाही.

Unconfirmed लेट्टर ऑफ क्रेडिट 

ह्यात गॅरंटी देणारी बँक छोटी असेल किंवा तिचे क्रेडिट रेटिंग कमी असेल तर Opening बँक ही तिला दुसर्‍या मोठ्या बॅंककडून गॅरंटी द्याला सांगते. अश्या छोट्या बँक कढून जारी केलेल्या लेट्टर ऑफ क्रेडिटला Unconfirmed लेट्टर ऑफ क्रेडिट बोलले जाते.

कन्फर्म लेट्टर ऑफ क्रेडिट (Confirm LC)

वरील सांगितल्या प्रकारे Unconfirmed लेट्टर ऑफ क्रेडिट ला मान्यता एक दुसरी मोठी बँक देते. त्या बँकेच्या जागी ती गॅरंटी घेते तेव्हा त्या बंकेकडून जारी करण्यात येणार्‍या लेट्टर ऑफ क्रेडिटलाच कन्फर्म लेट्टर ऑफ क्रेडिट बोलले जाते. आता ह्यात अपरिवर्तनीय लेट्टर ऑफ क्रेडिटलाच मान्यता/गॅरंटी देण्यात येते.

हस्तांतरणीय लेट्टर ऑफ क्रेडिट (Transferable letter of credit)

ह्यात विक्रेता आपले हक्क दुसर्‍या विक्रेत्याला पुर्णपणे किंवा अल्पपणे हस्तांतरित करू शकतो.

कधी वापरण्यात येते ?

 • जेव्हा विक्रेता हा एकमेव उत्पादक नसतो.

Back To Back लेट्टर ऑफ क्रेडिट

 • हे तेव्हा वापरण्यात येते जेव्हा विक्रेता हा उत्पादक नसतो आणि त्याच्याकडे तुम्ही दिलेली ऑर्डर पूर्ण करण्यासाठी गरजेचा स्टॉक नसतो तसेच ते पूर्ण करण्यासाठी लागणार भांडवल ही नसत अश्या वेळी तो तुम्ही दिलेल लेट्टर ऑफ क्रेडिट हे त्याच्या बँकेत देतो आणि त्या बदल्यात मूळ उत्पादकच्या नावाने दुसर लेट्टर ऑफ क्रेडिट ऑर्डर पूर्ण करण्यासाठी जारी करतो. 
 • बॅक टु बॅक लेट्टर ऑफ क्रेडिट ची रक्कम ही मूळ लेट्टर ऑफ क्रेडिट पेक्षा कमी असते

RED क्लॉज लेट्टर ऑफ क्रेडिट

 

 • ही एलसी तेव्हा दिली जाते जेव्हा मेन विक्रेत्याला ऑर्डर पूर्ण करण्यासाठी काही रक्कम आगवू(Advance) लागत असते. आता ही रक्कम त्याला उत्पादांनासाठी लागू शकते किंवा सामान कूरियर करण्यासाठी लागू शकते.
 • विक्रेत्याला ही रक्कम nominated बँक अडवांस मध्ये देते जेव्हा issuing बँक आपल्या एलसी मध्ये लाल रंगाच्या शाईने अडवांस देण्याची संमती दिली असेल.
 • अडवांस देण्याआधी nominated बँक विक्रेत्या कढून एक हमीपत्र लिहून घेते की तो सर्व डेलिवेरी चे कागदपत्र ठरलेल्या वेळेच्या आत बँकेत जमा करेल.

 

मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती, आम्हाला नक्की कळवा कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करून. आमच्या फेसबूक आणि Instagram पेज वर आम्हाला लाइक आणि फॉलो करा. पोस्ट आवढल्यास तुमच्या मित्र परिवारसोबत नक्की शेअर करा.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.