What is Bitcoin ? | काय आहे बिटकॉईन?

87

Bitcoin आभासी चलनेच्या दुनियेतील  एक लोकप्रिय नाण आहे. चला मग आज आपण ह्या चलना बाबत जाणून घेवूया.

बिटकॉईनचा जनक ?

  • २००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली.
  • एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या.

 Download Wazirx For Buying CryptoCurrency 

 

Bitcoin म्हणजे काय?

 

  • बिटकॉईन ही एक प्रकारची cryptocurrency आहे.  ह्याला आपण ऑनलाइन चलन असाही बोलू शकतो. ह्या चलनाला एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेलं असतं.
  • हे चलन ऑनलाइन साइट वरुण खरेदी किंवा विकू शकता, अगदी तुमच्या share market प्रमाणे आणि ऑनलाइन ह्याचा वापर ही आपण करू शकतो. 
  • ही खरेदी केल्यावर तुमचं एक वॉलेट तयार होतं, ज्यात ही करन्सी तुम्ही साठवू शकता. अशी प्रत्येक खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो. आणि या प्रक्रियेला माईनिंग म्हणतात.
  • भारतातही इन्फोसिसच्या इन्फोसिस फिनॅकल या सबसिडरी कंपनीनं Blockchain च्या माध्यमातून व्यवहारांसाठी 11 बँकांसोबत प्रायोगिक तत्त्वावर करार केला आहे.
  • बिटकॉईनचे व्यवहार ऑनलाईन चालतात. आणि हे व्यवहार एका ब्लॉकचेन नेटवर्कवर असलेल्या फक्त दोन व्यक्तींमध्ये होतात. आणि त्यावर इतर कुणाचंही नियंत्रण नसतं.
  • याशिवाय इथेरिअम, लाईटकॉईन, रिपल, डॅश, मोनेरो, डॉजकॉईन (Dogecoin), शिभा इणू अशा अनेक क्रिप्टो करन्सी आहेत. पण त्या बिटकॉईनच्या जवळपासही नाहीत. शिवाय त्यांची विश्वासार्हताही नाही.

बिटकॉईनचे फायदे काय?

  • बिटकॉईनचे व्यवहार कमीत कमी वेळात आणि वर्षाचे 365 दिवस, 24 तास आपण करू शकतो. बँकांच्या सुट्या, नोकरशाही यांचा परिणाम या व्यवहारांवर होत नाही.
  • कुठलाही व्यवहार केवळ दोन अकाऊंट्स दरम्यान होतो. यात मध्यस्थाची गरज नसते. इतर कुठल्याही ऑनलाईन व्यवहारात ही सुलभता नाही.
  • जगभरात अनेक वित्तीय संस्था बिटकॉईनचे ऑनलाईन व्यवहार सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत. भारतातही रिझर्व्ह बँक त्याबाबतीत सकारात्मक आहे. पण ही तरतूद ट्रेडिंग नाही तर ऑनलाईन व्यवहारांसाठी आहे. त्यासाठी ब्लॉकचेन सुरक्षित प्रणाली समजली जाते.
  • यासाठी डेबिट, क्रेडिट किंवा कुठलंही कार्ड लागत नाही. केवळ पहिल्यांदाच वॉलेट बनवायला एक ऑनलाईन व्यवहार करावा लागतो.
  • तुमची माहिती अतिशय गुप्त राखली जाते. किंबहुना ही माहिती आणि तुमचे बिटकॉईन पैसे एन्क्रिप्टेड स्वरुपात अर्थात काँप्यूटर कोडेड असतात. ते बिटकॉईन यंत्रणा चालवणाऱ्यांनाही माहीत नसतात.

 Download Wazirx For Buying CryptoCurrency 

 

भारतात क्रिप्टोकरन्सीला परवानगी आहे का?

  • व्हर्च्युअल करन्सीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करायला सुप्रीम कोर्टाने मार्च 2020मध्ये परवानगी दिलीय.
  • एप्रिल 2018मध्ये रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगवर सरसकट बंदी घातली होती. म्हणजे बँका किंवा कोणत्याही वित्त संस्थांना व्हर्च्युअल करन्सीशी निगडीत कोणतीही सेवा देता येणार नव्हती.
  • इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.
  • इतर अनेक देशांनी क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगला परवानगी दिलेली आहे आणि इतकंच नाही तर स्वतःची क्रिप्टोकरन्सीदेखील लाँच केलेली आहे असं इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशनचं म्हणणं होतं. यावर निर्णय देत सुप्रीम कोर्टाने क्रिप्टोकरन्सीमधल्या व्यवहारांचा मार्ग खुला केला.
  • हे काही सर्वसामान्य चलन नाही. म्हणजे तुम्हाला तुमचा टॅक्स किंवा इतर गोष्टींसाठीचं मूल्य क्रिप्टोकरन्सीने भरता येणार नाही.
  • पण हे चलन आभासी आहे, गोपनीय आहे आणि एका 27 ते 34 कॅरेक्टर्सच्या अॅड्रेस मार्फत बिटकॉईनचे व्यवहार होतात.या पत्त्याची कुठेही नोंद नसते. त्यामुळे व्यवहार गुप्त राहतो.शिवाय या व्यवहारांवर कोणत्याही नियामकाचं वा सरकारचं नियंत्रण वा लक्ष नसतं. या व्यवहारांसाठी काही नियम नाहीत. म्हणूनच याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते.
  • पण जमेची बाजू म्हणजे डिजीटल करन्सी असल्याने फसवलं जाण्याची शक्यता उरत नाही.
  • पण इंटरनेटवरून व्यवसाय करणाऱ्या अनेक कंपन्यांनी बिटकॉईन्स स्वीकारायला सुरुवात केलेली आहे.
  • पण ज्यांच्याकडे बिटकॉईन्स आहेत ते बहुतेकजण याकडे गुंतवणूक म्हणून पाहतात कारण या बिटकॉईन्सचं मूल्य प्रचंड आहे आणि ते सतत बदलत असतं. यातून मोठे रिटर्न्स मिळतात.
  • या बिटकॉईनचं मूल्य 2019च्या वर्षभरात 900 टक्क्यांनी वाढलं आणि अनेकजण या बिटकॉईन्समुळे श्रीमंत झाले.

 Download Wazirx For Buying CryptoCurrency 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.