What is CryptoCurrency? | Cryptocurrency म्हणजे काय?

74

What is CryptoCurrency? | Cryptocurrency म्हणजे काय?

मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच असेल पूर्वी कोणतेही व्यवहार करण्यासाठी चलन वापरले नाही जायचे. एखाद्या वस्तुच्या मोबदल्यात दुसरी वस्तु दिली जात असे. कालांतराने शिक्के म्हणजे कोईन निर्माण करण्यात आले, ज्याला आपण चलन बोलू लागलो. त्या नंतर नोट आल्या. 

आता नवीन ट्रेंड सुरू झाला आहे आणि तो आहे cryptocurrency चा. हे एक चलन आहे ज्याला मान्यता तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी दिली आहे आणि त्याला निर्माण करणारे सुद्धा तुमच्या आमच्या सारखे सामान्य लोकच आहेत. आता हे चलन कोणत्याही कागदावर नाही किंवा कोणत्या धातू वर ही नाही. आजच्या डिजिटल दुनियेतील हे एक डिजिटल चलन आहे. mining द्वारे ह्याची निर्मिती केली जाते.

सुरवात 

 • साधारण एक दशक पूर्वी cryptocurrency ची निर्मिती करण्यात आली. Bitcoin ही पहिली cryptocurrency होती. सुरवातीला हे चलन मोफत भेटत होते. कालांतराने ह्याची किमत वाढु लागली. आणि गेल्या एक दशकात ह्याची किमत २५ लक्षाहुन अधिक झाली आहे. 
 • २००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली.
 • एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या.
 • क्रिप्टोकरन्सी हे BlockChain प्रणाली वर चालते.

मान्यता, प्रणाली,फायदे आणि विकास 

 • अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही. कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली आहे.
 • अनेक देशांतील बँका, हॉटेल, कंपन्या, संकेतस्थळे यांनी आभासी चलनाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे या चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातूनच या आभासी चलनांचे विनिमय बाजार उभे राहिले. या बाजारांत जगभरातील आभासी चलनांचे भौतिक चलनांच्या तुलनेतील मूल्य दररोज ठरते.
 • बिटकॉइन’ या आद्य आभासी चलनाचे मूल्य तर आकाशाला गवसणी घालत आहे. मागील वर्षी (२०१९) एप्रिल मे महिन्यामध्ये एका बिटकॉइनचे मूल्य जवळपास ९ हजार डॉलरइतके पोहोचले होते. भारतीय रुपयाच्या चौकटीत सांगायचे झाले तर एका बिटकॉइनचे मूल्य जवळपास सहा लाख सहा हजार रुपये इतके आहे.
 • ‘बिटकॉइन’सारख्या सर्वच आभासी चलनांच्या घोडदौडीचे आणखी एक उदाहरण भारताच्याच अनुषंगाने देता येईल. २८ एप्रिल २०१९ रोजी एका बिटकॉइनचे मूल्य ३ लाख ६० हजार रुपये इतके होते. तेच मुल्य २८ मे २०१९ रोजी ६ लाख ६ हजार रुपयांवर पोहोचले. म्हणजेच, जर एखाद्याने एप्रिलमध्ये खरेदी केलेला एक बिटकॉइन मेमध्ये विकला तर महिनाभरात त्याला तब्बल तीन लाख रुपयांचा घसघशीत नफा कमवता आला असेल.

 Download Wazirx For Buying CryptoCurrency 

 • तर असं हे आभासी चलनाचं वाढतं साम्राज्य. आभासी चलनाला अजूनही अनेक देशांत मान्यता मिळालेली नाही. आजही ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. तरीही या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात आहे.
 • साहजिकच फेसबुकने हे ताडले आणि या नव्या उद्योगात शिरकाव करण्याचा निर्णय घेतला. तसं तर फेसबुकने दहा वर्षांपूर्वीही ‘फेसबुक क्रेडिट’ हे आभासी चलन जारी केले होते.
 • फेसबुकवरून खेळल्या जाणाऱ्या गेम्स किंवा वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅपमधील खरेदीसाठी ‘फेसबुक क्रेडिट’चा वापर करता येत होता. त्या वेळी एका डॉलरला दहा फेसबुक क्रेडिट मिळत होते. मात्र, ‘फेसबुक क्रेडिट’ वापरकर्त्यांच्या पचनी पडले नाही. याची दोन कारणे होती. एक म्हणजे, त्या काळी फेसबुक आजच्याइतके जगभरात रुजले नव्हते आणि दुसरे म्हणजे, तोपर्यंत आभासी चलन ही संकल्पना रूढ झाली नव्हती. आज हे दोन्ही अडथळे दूर झाले आहेत.

 

मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा लेख आवडला असेल आणि cryptocurrency म्हणजे काय हे नक्कीच कळले असेल. तुमचे मत आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करून नोंदवू शकता. पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र परिवरणा ही पोस्ट नक्की शेअर करा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.