बिना अडवांसचे परदेशातून मागवा सामान, बँकेकडून मिळणार्‍या या सेवेचा करा योग्य वापर | Letter of Credit

45

लेट्टर ऑफ क्रेडिट हे एक प्रकारची बँक गरेंटी आहे. जी  बिना वित्तीय आधाराची क्रेडिट फॅसिलिटी आहे. पण ही मुळ बँक गरेंटी पेक्षा वेगळी असते. ह्या दोन्ही सेवांमध्ये लोक नेहमी कन्फ्युज असतात. ते नेहमी दोघांना एकच समजत असतात. पण हे दोन्ही वेगळ्या instrument आहेत आणि दोघांचा वापर ही वेग वेगळ्या कारणांसाठी केला जातो.

हे मुख्यतः विक्रेता आणि खरीदार मध्ये वापरले जाते. समझा तुम्हाला एखादी वस्तु किंवा माल विकत घ्यायचा आहे आणि तो विक्रेता तुमच्या देशातच राहत नाही, अश्या वेळी पैशयाच्या देवाण-घेवाणसाठी खरीदार म्हणून तुम्हाला विक्रेत्यावर विश्वास ठेवण कठीण जात आणि विक्रेत्याला तुमच्या वर विश्वास ठेवण कठीण जात. त्यावेळी लेट्टर ऑफ क्रेडिट चा वापर केला जातो.

लेट्टर ऑफ क्रेडिट चे प्रकार

कसा केला जातो लेट्टर ऑफ क्रेडिटचा (Letter of Credit) वापर

वरील उदाहरणा प्रमाणे आपण समजूया की तुम्ही एक खरीदार आहात आणि तुम्हाला परदेशातून काही माल तुमच्या व्यवसायसाठी मागवायचा आहे. आता माल परदेशातून येणार असल्याने विक्रेता तुम्हाला योग्य माल पाठवतो की नाही किंवा मालच तुम्हाला मिळेल की नाही या बाबत तुम्ही शास्वत नसता. अश्या वेळी तुम्ही माल मिळण्याच्या आधी पेमेंट करण्यास घाबरता तसेच विक्रेतलाही खात्री नसते की माल एकदा पोहचला की त्याला त्याच पेमेंट मिळणार की नाही.

अश्या वेळी लेट्टर ऑफ क्रेडिटचा उपयोग केला जातो. ह्यात बँकच विक्रेत्याला पैसे देते जेव्हा काही ठराविक नियम पूर्ण होतात. विक्रेत्याला त्याच समान पाठवायचे असते आणि काही कागदपत्र जमा करायचे असतात.

काय आहे प्रक्रिया

 • खरीदारला(Applicant) त्याच्या बँकेत जावून लेट्टर ऑफ क्रेडिट साठी आवेदन करावे लागते.
 • आता Applicant ची बँक(Opening / Issuing Bank ) ही विक्रेत्याच्या बँकेत(Advising Bank) ला लेट्टर ऑफ क्रेडिट पाठवते.
 • Advising Bank लेट्टरची Authenticity चेक करते.
 • Advising Bank ते letter विक्रेत्याला पाठवणार.
 • आता विक्रेत्याला खात्री होते आणि तो त्याचे माल ship करतो.
 • आता विक्रेता Bill of Lading Nominated/Negotiating Bank ला पाठवतो.

Nominated/Negotiating Bank ही Advising Bank सुद्धा असू शकते किंवा वेगळी ही असू शकते.

 •  Nominated/Negotiating Bank जमा केलेले कागदपत्र तपासते आणि ह्याची खातरजमा करते की माल नीट ship करण्यात आला आहे की नाही. 
 • कागदपत्र आणि बाकी चेकिंग नंतर Nominated/Negotiating Bank विक्रेत्याला त्याचे पेमेंट देते.
 • Nominated/Negotiating Bank आता opening बॅंकला कागदपत्र पाठवते आणि पेमेंट ची मागणी करते.
 • ह्या स्टेपला opening Bank, Applicant ला सर्व document पाठवते आणि applicant ते सर्व document बरोबर असल्याची आणि सर्व माल जसा मागवला आहे त्याप्रमाणे पाठवण्यात आला आहे ह्याची खातरजमा करतो.
 • सर्व व्यवस्थित असल्यावर Applicant Opening Bank ला पैसे पाठवतो ते पैसे पुढे Opening Bank Nominated/Negotiating Bank ला पाठवते.

म्हत्वाचे मुद्दे

 • लेट्टर ऑफ क्रेडिट Collateral च्या विरुद्ध दिले जाते. collateral बँक डिपॉजिट  किंवा फिक्स्ड डिपॉजिटच घेतलं जाते.
 • बँक लेट्टर ऑफ क्रेडिट साटी काही शुल्क ग्राहकाकडून आकारते. हे शुल्क बँक कोणत्या प्रकारचे लेट्टर ऑफ क्रेडिट issue करते त्यावर अवलंबून असते.
 • आता हा इंटरनॅशनल ट्रेड असल्यामुळे  इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स (ICC) ने  काही नियम ठरवून दिलेले असतात त्याच पालन करणे गरजेचं असते.
 • लेट्टर ऑफ क्रेडिट मध्ये गरजेची सर्व माहिती स्पष्ट भरलेली असावी : विक्रेत्याच नाव, तारीख, मालाचे/उत्पादनाचे  नाव, Quantity आणि बाकीची काही इतर माहिती असल्यास ती भरणे गरजेचे आहे.
 • लेट्टर ऑफ क्रेडिट मध्ये छोटीशी पण चूक मान्य नसते. जर साधी स्पेलिंग मिसटेक जारी आढळली तरी विक्रेत्याला पेमेंट केले जात नाही.
 • पूर्ण प्रक्रियेत कागदपत्रच महत्वाचे असतात ह्यात बँकेला सामनाशी काही घेण देन नसते. जर कागदपत्र नीट असतील तर बँक विक्रेत्याला पेमेंट करते.
 • हे पेमेंट सामान खराब आले किंवा नाही यावर अवलंबून नसते.

 

लेट्टर ऑफ क्रेडिट (Letter of Credit) चे फायदे

 

Sr.No.  विक्रेत्याचे फायदे  खरीदराचे फायदे
१. खरीदारकडून पेमेंट मिळण्याची हमी भेटते. सामान मिळण्याची हमी मिळते
२. प्रॉडक्शनची रिस्क कमी होते, चुकून ग्राहकाने ऑर्डर बदलली किंवा कॅन्सल केली तरी लेट्टर ऑफ क्रेडिट नुसार त्याला पेमेंट हे भेटणार. लेट्टर ऑफ क्रेडिट प्रारंभिक देय कमी करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी खरेदीदारास पतदारी दर्शवीते

 

मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती, आम्हाला नक्की कळवा कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करून. आमच्या फेसबूक आणि Instagram पेज वर आम्हाला लाइक आणि फॉलो करा. पोस्ट आवढल्यास तुमच्या मित्र परिवारसोबत नक्की शेअर करा.

 

80%
Awesome
 • Design

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.