Why We loss in share market? : शेअर मार्केट मध्ये तोटा का होतो? 2021

480

Why We loss in share market?

मित्रांनो शेअर मार्केट बर्‍याच जणांना जुगार वाटतो तर बर्‍याच जणांना तो अलिबाबाची खजाण्याची गुफा ….
पण नक्की शेअर मार्केट काय आहे ? जुगार की अलिबाबाची गुफा ? शेअर मार्केट मध्ये 95% लोक नुकसान करत असतात तर 5% लोकांसाठी ही नशिबाची किल्ली बनते… 

पण हा तफावत का आहे? का इतके लोक शेअर मार्केट मध्ये नुकसान करतात ? (why we loss in share market?).

ह्या साठी आपल्याला सर्वात आधी एका प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे ….आणि तो प्रश्न आहे लोक शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक का करतात?

१. लोक शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक का करतात?

 

प्रश्न जितका सोपा दिसतो मित्रांनो तितका सोपा हा प्रश्न नाही. बरेच लोक म्हणतील पैसे कमवण्यासाठी सगळे गुंतवणूक करतात. पण हे उत्तर माझ्या मते चुकीच आहे मित्रांनो. कारण पैसे कमवण्यासाठी लोक मेहनत करत असतात, काम करत असतात. मग गुंतवणूक आणि तेही शेअर मार्केट मध्येच अस का ? ह्याच सर्वात मोठ आणि मुख्य कारण आहे माऊथ पब्लिसिटी .

तुमच्या मित्राने सांगितलं मला 50,000 च्या गुंतवणुकीवर 2,00,000 नफा झाला. तुमच्या डोक्यात झटपट पैश्याची लालसा उत्तपण झाली. अजून काही दिवसात तुमच्या कामावरील सहकार्‍यांनी सांगितलं ती लालसा वाढली, मग यूट्यूब वर तुम्ही सर्च करता, अनेक रातोरात करोडपती बनवणारी विडियो तुम्ही पाहता आणि ह्या सगळ्यांचे बळी बनता ही आहे पहिली पायरी .

 

२. माहिती आणि ज्ञांनाची कमतरता 

पहिली पायरी चडल्या नंतर तुम्ही शेअर मार्केट मध्ये उडी मारता पण ज्ञानाचे काय ? शेअर मार्केट हा जुगार नसून एक सखोल अभ्यासक्रम आहे हे मूळ लोक नेहमी विसरतात किंभहुणा ते त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. सोपे पर्याय शोधू लागतात. शेअर मार्केट काय आहे ते कसे चालते ह्याचा अभ्यास नसल्यामुळे ते गुंतवणुकी ऐवजी जुगार खेळू लागतात. बर्‍याच वेळा ते टिप्स वरती अवलंबून राहतात. आणि अश्यावेळी स्व:हताची फसवणूक बर्‍याच लोकांकढून करून घेतात.

 

३. व्यवसायाप्रमाणे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक न करणे. 

मित्रांनो एकदा व्यवसाय सुरू करताना आपण काही पूर्व अभ्यास करत असतो. जसे व्यवसाय किती काळ टिकू शकतो ? मार्केट मध्ये त्या व्यवसायची डिमांड आहे का? अगदी तसेच आपण पहिलं पाहिजे ज्या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणुकीचा आपण विचार करत आहोत ती कंपनी कमीत कमी १० वर्ष तरी मार्केट मध्ये टिकू शकते का? तिच्या प्रॉडक्ट मध्ये इतका दम आहे का ती पुढील १० वर्ष नफा कमवू शकते. 

 

उदाहरण द्याचे झाले तर टाटा मोटर्स (Tata Motors) घ्या कोणीही सांगेल ही कंपनी १० वर्षाहून अधिक नक्कीच चालेल. हे नक्की करा की ज्या कंपनीचे शेअर आपण खरेदी करीत आहात त्यांना दीर्घकाळ नफा मिळेल का? 

नेहमी दीर्घकाळ नफ्याविषयी विचार करून गुंतवणूक केली पाहिजे पण असे सहसा लोक करत नाही. आपण निश्चित करा की या कंपन्या १० वर्षानंतरसुद्धा अस्तित्वात राहतील आणि त्यांना नफा मिळत राहील. अशा कंपन्या कमी असतात ज्या दीर्घ काल नफा कमावू शकतात आणि बाजारात राहू शकतात. सध्या  आय. पी. ओ. ची ओढ मार्केट मध्ये लागलेली दिसते, बर आय.पी.ओ. जारी करणाऱ्या जवळजवळ २५ टक्के कंपन्या ५ टक्क्यांपेक्षा कमी नफा घेऊन व्यवहार करीत आहेत. या वर्गात येणारे जास्तीत जास्त व्यवसाय दीर्घकाळ फायदेशीर होत नाहीत आता ह्याचे आकलन तुम्हाला करता आले पाहिजे. 

हे वाचा :  शेअर मार्केट म्हणजे काय? Share Market Basic Information in Marathi

४. योग्य किमतीने शेअर खरेदी न करने

 

एका चांगल्या व्यवसायाचा अर्थ हा नाही, की त्यात गुंतवणूक करणेसुद्धा चांगलेच असेल. असे समजा, की आपण एक टाटा इंडिका  खरेदी करू इच्छीत आहात, जिची बाजारातील किंमत ५.५९ लाख रुपये आहे. जर कोणी एखादी नवी कार २.२५ रुपयात विकण्यास तयार झाले तर आपण ती जरूर खरेदी करण्याची इच्छा कराल; पण जर कोणी आपणास या कारसाठी ५ लाख रुपये किंमत मागेल तर आपण त्याच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहणार नाही. आपण तोपर्यंत वाट पाहणे पसंत कराल जोपर्यंत योग्य भावाने आपणास कार मिळत नाही. हेच वागणे आपल्याला शेअर्स खरेदीच्या वेळीसुद्धा ठेवले पाहिजे. नेहमी मूल्याकडे लक्ष ठेवावे.

५. मोहात घालणाऱ्या योजना

 Telegram ग्रुप, व्हाट्सअप ग्रुप, एस. एम. एस. संदेश, दलालाचे प्रस्ताव वा अंतर्गत व्यक्तींशी गुप्त चर्चा या आधारावर गुंतवणूक करण्याचा कल लोकांमध्ये खूप असतो. अशा मायावी लोकांची कमी नाही ते आकर्षक योजनांमार्फत नवीन गुंतवणूकदारांना भुलवितात. ‘पंप एंड डंप ‘ यालाच म्हणतात. 

काही लोक सर्वांत अगोदर शेअर खरेदी करून प्रचार करतात की तीन ते सहा महिन्यांत त्यांचे भाव दुप्पट होतील. जेव्हा सगळेच शेअर खरेदी करू लागतात तेव्हा ते भाव पाडतात. 

 

बरेच लोक समजतात की बचत आणि गुंतवणूक यात काहीच फरक नाही, पण ते सत्य नाही. प्रत्यक्षात दोन्ही पण संपत्ती व्यवस्थापनाच्या दोन वेगळ्या पद्धती आहेत. या दोन्हीमधील फरक समजून घेत आपण आपल्या वित्तीय जरुरतीनुसार जागृतपणे डोळसपणे निर्णय घेऊ शकता.

 

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूकदारांनी ‘काय करावे ?’ आणि ‘काय करू नये ?’ 

 

क्रमांक

काय करावे ?

काय करू नये ?

१. नेहमी सेबी एक्सचेंजमध्ये अधिकृत बाजार संस्थांसोबत संबंध ठेवा. आपल्या ब्रोकर एजंटला डिपाझिटरी पार्टिसिपेंटला स्पष्ट निर्देश द्या. अनधिकृत दलाल, उपदलाल यांच्याशी व्यवहार करू नका.
२. आपल्या ब्रोकर एजंटला डिपाझिटरी पार्टिसिपेंटला स्पष्ट निर्देश द्या. अफवा, ज्यांना सामान्यपणे ‘टिप्स’ म्हणतात या आधारावर व्यवसाय करू नका
३.  नेहमी आपल्या ब्रोकरशी करार कागद मागून घ्या. सौद्याविषयी संशय असल्यानंतर एक्सचेंजच्या बेबसाईटवर त्याच्या वास्तविकतेची पुष्टी करा. खात्रीच्या रीटर्नवाल्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका.
बाजार मध्यस्थाचे बाकी देणे नेहमी सामान्य बँकिंग माध्यमातून करा. सरकारी सस्थेतर्फे मंजुरी, रजिस्ट्रेशन दाखविणाऱ्या कंपन्यांच्या मोहात अडकू नका, कारण मंजुरी अन्य उद्देशासाठीसुद्धा असू शकते, त्या वस्तुविषयी नाही ज्या आपण खरेदी करीत आहात.
५   बाजार मध्यस्थांना एखादा आदेश देण्यापूर्वी कंपनी, तिचे व्यवस्थापन, फंडामेंटल्स आणि कंपनीद्वारे केल्या गेलेल्पा नवीन घोषणा, विभित्र नियमांतर्गत केलेले विभिन्न खुलासे पडताळून – पारखून पाहा. माहितीचे स्रोत आहेत, एक्सचेंज आणि कंपन्यांच्या वेबसाईट्स, व्यावसायिक पत्रिका इत्यादी.  एखाद्या मध्यस्थाच्या हातात स्वतःचे डीमॅट व्यवसायाचे पावती पुस्तक देऊ नका. 
६. व्यवहार गुंतवणूक नीती स्वीकारताना जोखीम पत्करण्याची स्वत:ची क्षमता लक्षात ठेवा, कारण सर्व गुंतवणूक नीतीवर अवलंबून असते.  प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील कंपन्यांच्या आर्थिक प्रदर्शनाविषयीच्या जाहिरातबाजीच्या विळख्यात सापडू नका. 
७. कोणत्याही मध्यस्थाचे ग्राहक बनण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, याशिवाय गुंतवणूकदारांना विनंती केली जाते, की ते ‘रिस्क डिसक्लोजर डॉक्यूमेंट’ म्हणजेच जोखमीचा खुलासा करणारा दस्तावेज लक्षपूर्वक वाचाल. जो शेअर बाजारात ब्रोकरमार्फत व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या आधारभूत आवश्यकतांचा एक भाग आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील कंपन्यांच्या आर्थिक प्रदर्शनाविषयीच्या जाहिरातबाजीच्या विळख्यात सापडू नका.
८. तशा शेअर्सविषयी सावध राहा, ज्यांची किमत वा व्यवहारात अचानक उसळी येते, विशेषत: कमी किमतीच्या स्टॉक बद्दल.  गुंतवणुकीचा निर्णय घेते वेळी डोळे झाकून त्या अन्य गुंतवणूकदारांची नक्कल करू नका, ज्यांनी आपल्या गुंतवकीतून नफा कमावला आहे.
९.  कृपया हे जाणून घ्या, की शेअर बाजारात गुंतवणुकीवर कोणत्याही खात्रीचे रिटर्न नसतात. काय करू नये? अनधिकृत दलाल, उपदलाल यांच्याशी व्यवहार करू नका. अफवा, ज्यांना सामान्यपणे ‘टिप्स’ म्हणतात या आधारावर व्यवसाय करू नका. खात्रीच्या रीटर्नवाल्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका.

 

मित्रांनो आशा आहे तुम्हाला कलेले असेल Why We loss in share market? शेअर मार्केट मध्ये नुकसान का होत असतो. तुम्ही आपल्या ह्या चुका सुधारून Trading द्वारे चांगले प्रॉफिट मिळवाल अशी आशा आम्हाला आहे. पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा. तुमच्या कोणत्या मित्राला, नातेवाईकला जर Why We loss in share market?  हा प्रश्न पडत असेल तर त्यांना ही पोस्ट वाचायला नक्की सांगा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.